लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पुण्यात पंतप्रधान मोदींचं मंदिर !

मोदींची ही मूर्ती खास जयपूर येथून तयार करून आणली

लोकवार्ता । प्रतिनिधी

पुणे : भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं आहे.या मंदिरातील मोदींच्या मूर्तीची उंची दोन फूट इतकी आहे. मोदींची ही मूर्ती खास जयपूर येथून तयार करून आणली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागल्याचं मयुर मुंडे सांगतात.

Modi Temple in Pune

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत.

Modi Temple in Pune

या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आलाय.

Modi Temple in Pune

या मंदिरासमोर अनेकजण आवर्जून फोटो काढून घेतानाही दिसत आहेत. काहींना सेल्फीचा मोहही आवरत नाहीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. मोदींचं हे मंदिर उभारण्यासाठी एका फाऊंडेशनने मुंडे यांना अर्थसहाय्य करण्यात आलंय. ‘नमो फाऊंडेशन’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर उभारण्यात आलं आहे.हे मंदिर उभारण्यासाठी दीड लाख खर्च करण्यात आला आहे.

Modi Temple in Pune

१५ ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात आल्यापासून येथे अनेकजण हे मंदिर पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani