पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहू नगरीत! अनेक कार्यक्रमांसाठी राहणार उपस्थित..
-शिळा मंदिराच्या उदघाटनासाठी राहणार उपस्थित.
देहू । लोकवार्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौ-यावर आहेत. मुख्यत: पुण्यातील देहू आणि नंतर मुंबई काही शासकीय कामांच्या उद्घाटनानिमित्त ते राज्याच्या दौऱ्यावर आहे. दुपारी देहूतील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. तर त्यानंतर ते मुंबईमधील जलभूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतीकारक गॅलरीचे उद्घाटन करणार आहेत. त्यासोबतच संध्याकाळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सयेथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत. पुणे आणि मुंबई असा हा दौरा आहे. या दोऱ्यानिमित्त मोठी पोस्टरबाजी भाजपातर्फे करण्यात आली आहे. दुसरीकडे या दौऱ्याला अनेकांनी विरोध देखील केला आहे. काही स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात हा विरोध होत आहे. तर वादही पाहायला मिळत आहेत.

उद्या (14 जून) दुपारी 1:45च्या सुमाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथील श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन करतील.संध्याकाळी 4:45च्या सुमाराला मुंबईमधील जलभूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन करतील.संध्याकाळी 6च्या सुमाराला मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार..