लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती उपक्रमाचा निषेध- दिगंबर काशिद

दिगंबर काशीद यांचा महापालिकेवर आरोप.

पिंपरी । लोकवार्ता

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विषयी असलेली सहानुभूती ही फक्त गणेश उत्सवात मध्येच व्यक्त करते पण वस्तुस्थिती अशी आहे की चिखली कुदळवाडी या परिसरामध्ये लाखो टन प्लास्टिक, फायबर, अविघटनशिल घातक पदार्थ हे जाळले जातात. इंद्रायणी नदीचे प्रदूषण केले जाते याकडे सारासार पीसीएमसी महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे आणि विनाकारण गणेश उत्सवाच्या वेळेस अतिशय पर्यावरण बद्दल सहानुभूती व्यक्त करते. जिथे प्रमुख पर्यावरणाची हानी होते ती चिखली, कुडळवडी, मोशी अवैध उद्योगधंदे असलेल्या तिथली मुसिक कुदळवाडी परिसरात होते. त्यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालय या सर्वांना निवेदन दिले तरीदेखील त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही फक्त गणेश उत्सवांच्या वेळेसच यांना पर्यावरणाबद्दल कळवळा व्यक्त केला जातो.असे आरोप दिगंबर काशीद यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेवर केले आहे..

हे सर्व हत्ती सोडून शेपूट धरण्याचे काम आहे, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पर्यावरण बद्दल अतिशय संवेदनशील आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न आहे अशी असे काही नसून यांना पर्यावरणाची कोणतीही काळजी नाहीये पर्यावरण विभाग हा फक्त हप्ते वसूल करण्यासाठी आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
10 फेमस ट्रेकिंग प्लेस | Best Trekking Place Near Pune महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काही खास फोटो गुलाबी वेशात सोनालीची अदाकारी | Sonalee Kulkarni प्राजक्ता माळीचा मराठमोळा लुक | Prajakta Mali Marathi Actor या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला द्या ‘हे’ गिफ्ट्स