सक्षम सोशल फाउंडेशन मोशी यांच्या वतीने सार्वजनिक गुढीपाडव्याचे आयोजन
-ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सार्वजनिक गुढीपाडवा सण संपन्न.
मोशी । लोकवार्ता-
सन 2019 नंतरच्या कोरोना महामारी नंतर सन 2022 मधील गुढीपाडवा खऱ्या अर्थाने भारत वर्षात आनंदाने व उत्साहाने सर्वच जण साजरा करीत आहोत. यंदाचा गुढीपाडवा श्री नागेश्वर महाराज यांच्या सामर्थ्य अशा भूमीत संत ज्ञानोबा संत तुकाराम महाराज यांच्या टाळ मृदंग भजनांच्यामुळे पवित्र भूमीत सक्षम सोशल फाउंडेशन मोशी यांच्या वतीने सार्वजनिक गुढीपाडवा शनिवार दिनांक 2/4/2022 चैत्र शु. प्रतिपदा शके १९४३ रोजी सकाळी १० वाजता महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सार्वजनिक गुढीपाडवा सण संपन्न करण्यात आला. प्रभू रामचंद्र आणि वारकरी पताका यांचे पूजन करण्यात आले ५१ गुढ्या उभारून गुढीची पूजा करण्यात आली सार्वजनिक गुढीपाडवा हा अनोखा परंतु परंपरेची कास धरून संतांची नदींची फुलांची नक्षत्रांची थोर नेत्यांची ग्रंथांची व वैविध्यपूर्ण नामफलक लावली गेली.

या या उत्सवात प्रामुख्याने श्री.आप्पा बालघरे, ताराचंद परदेशी, रामदास बोरुडे, नंदकिशोर लोखंडे, मनोहर वलोकर, प्रकाश चौधरी, पुरुषोत्तम आवटे तसेच पत्रकार संजय शिंदे व आदिशक्ती महिला बचतगटाच्या श्वेता बारणे, रेश्मा कोळी, पद्मजा शिंदे, स्वाती गुरमाळे, श्रद्धा लिंगाडे, पूजा मारकळ, किरण गुरमाळे, ज्योती वेदपाठक, मेघा आहिरे, जया तोटे, सुरेखा मते, पल्लवी वाहटुळे, शोभा पवार तसेच युवाशक्ती महिला बचतगटाच्या सीमा निकम, विद्या मिसाळ, पूर्णिमा नाफडे, प्रिया पाटील, अक्षरा चव्हाण, मीनाक्षी रसाळ, उर्मिला जाधव, संचिता प्रचंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन श्री आतिश आनंदराव बारणे यांनी केले अनेक महिला व नागरिकांनी या सार्वजनिक गुढी स्थळाला सदिच्छा भेट देऊन कौतुक व्यक्त केले.
टाळी वाजवावी | गुढी उभारावी वाट ति चालावी पंढरीची ||
या संतांच्या वचनाने परामर्श घेत सक्षम फाउंडेशन मोशी यांनी या सार्वजनिक गुढीपाडवा हा उत्सव साजरा केला. यामुळे नव्या पिढीला विज्ञानाच्या गतिमान युगात जुन्या रूढी परंपरा यांचे संवर्धन करून त्या विज्ञानाला अनुसरूनच आपल्या पूर्वजांनी साजऱ्या केल्या. त्यांच्या विचारांचे जतन करीत या औद्योगिक नगरी करणाच्या वाढत्या प्रमाणात संस्कृती संस्कार सणाचा विसर पडू देऊ नये याकरिता सार्वजनिक गुढीपाडव्याचे आयोजन करण्यात आले.
