सिद्धू मुसेवाला हत्येचं पुणे कनेक्शन…आठ आरोपींपैकी दोन आरोपी पुण्याचे
दोन्हीही आरोपी बिष्णोई गॅंग चे सदस्य.
पुणे । लोकवार्ता
पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली. त्यानंतर आता या हल्ल्याबाबात नवनवे खुलासे रोज होत आहेत महत्त्वाचं म्हणजे सिद्धू मुसावालाच्या हत्येच महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. सिद्धू मुसावालाच्या हत्येसाठी 8 शूटर बोलवण्यात आले होते. त्यापैकी दोघे हे महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलय महाराष्ट्राच्या पुण्यातून पंजाबमध्ये हत्याकांड करण्यासाठी दोघा शूटरला बोलावण्यात आले होत, अशी खळबळबजनक माहिती उघडकीस आली आहे पुण्यातील दोघा शूटरची नावही समोर आलीत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या दोघा शूटर्सची नावं आहेत. मुसावाली हत्या करण्यासाठी तीन राज्यातील आठ शूटर मागवण्यात आले होते. त्यापैकी तिघे पंजाबमधील तिघे राजस्थानमधील आणि दोघे महाराष्ट्रातील होते आता याप्रकरणी अधिक तपास केला जातोय सोरभ महाकाळ याला मंचरवरून तर संतोष जाधव याला पुण्यातून ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहितीही समोर येतेय.

आठ शूटर्सही ओळख पटली
- आठपैकी दोघेजण पुण्यातील
- संतोष जाधव आणि सौरव महाकाळचाही हत्याकांडात हात
- आठ राज्यातून मागवण्यात आले होते तीन शार्पशूटर
- पंजाब, राजस्थानातून प्रत्येकी तीन शूटर मागवले
- पुण्यातून दोघा शूटर्सला हत्येसाठी बोलावण्यात आलं होतं 7. पंजाब पोलिसांकडून हत्याप्रकरणी अधिक तपास सुरु