पुण्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा ! या बातमीने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले…
लोकवार्ता : पुण्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील मुख्य धरणे आणि जलाशयांमध्ये ४१ % पाणीसाठा शिलक्क आहे. तसेच पुण्यातील धरणांमध्ये पाणीसाठा अवघ्या ३५ % वर असल्याने यंदा पुणेकर हैराण झालेत.

पुण्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील मुख्य धरणे आणि जलाशयांमध्ये ४१ % पाणीसाठा शिलक्क आहे. तसेच पुण्यातील धरणांमध्ये पाणीसाठा अवघ्या ३५ % वर असल्याने यंदा पुणेकर हैराण झालेत.
दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिलेल्या आठ धरणांपैकी चार धरणे पुण्यातील असल्याचीही माहिती मिळत आहे. तर शून्य टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये पुण्यातील नाझरे या धरणाची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून आधीच पुण्यात पाण्याची टंचाई आहे. त्यात आता ही बातमी समोर आली आहे. आता पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.
जरी पुण्यात पावसाचे वातावरण झाले असले तरीही गेल्या काही दिवसांत उष्णतेचा तडाका वाढला होता. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत होती. त्यात आता या बातमीने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.