यंदा पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपणार? पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांना केले आवाहन?
लोकवार्ता : यंदा पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपवावी असं आवाहन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. याबाबत सर्व मंडळांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पाच हजारांपेक्षा जास्त अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. 3 हजारांपेक्षा जास्त गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता मिरवणूक सुरू होणार आहे. उद्या सकाळपर्यंत मिरवणूक संपेल, अशी आशा अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. लोकांच्या सेवा सुविधांचा विचार करून सगळी व्यवस्था केली आहे, असे ते म्हणाले.
गणपती बाप्पा मोरया अस का म्हणतात?
मिरवणुकीत सहभागी होणारी मंडळे त्याचप्रमाणे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यांची काळजी घेतली गेली आहे. वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी रस्ते बंद तर रिंग रोड तयार करण्यात आला आहे. सकाळी सातपासून हे सगळे रस्ते काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी वळवण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे. ध्वनी प्रदुषण, मारामारी, पाकिटमारी, महिलांची छेड तसेच समाज विधातक कृत्ये घडू नयेत, याचे नियोजन केल्याचे गुप्ता म्हणाले.