सत्ता बदलाचे पडसाद पुण्यातही; महाविकास आघाडीचे 20 नगरसेवक भाजपात जाणार?
लोकवार्ता : राज्यातील सत्ता बदलाचे पडसाद पुण्यातही दिसत आहेत. महाविकास आघाडीचे २० नगरसेवक आता भाजपात जाणार असल्याची चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यांनतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. आता राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे सरकार स्थापन झाले. त्यानंतर अनेक जण शिंदे सरकार मध्ये जात आहेत. याचे पडसाद आता पुणे महानगरपालिकेवर उमटलेले दिसत आहेत. पुण्यातील जवळ जवळ २० नगरसेवक आता भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलाय.
महाविकास आघाडीतील १८ ते २० नगरसेवकांनी भाजपकडून उमेदवारी मिळू शकते का या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्थानिक नगरसेवकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर होणाऱ्या बदलानंतर आपला काहीतरी निभाव लागावा यासाठी महाविकास आगाडीचे अनेक नेते प्रयत्न करत आहेत. ज्या नगरसेवकांनी भाजपशी संपर्क साधला त्यामध्ये सार्वधिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे देते आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.