विधानसभेनंतर आता पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक होणार?
लोकवार्ता : पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये आमदारांच्या निधनानंतर फेब्रुवारी महिन्यात पोटनिवडणूक झाली होती. दरम्यान, आता खासदार गिरीश बापट यांचे निधन झालं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पोटनिवडणुक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कायद्यानुसार लोकसभा जागा रिक्त असेल तर त्या ठिकाणी सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक झाली पाहिजे. १५१A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार विद्यामान लोकसभेचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक होणार आहे. जर हा कार्यकाळ एका वर्षापेक्षा कमी असाता तर निवडणूक झाली नसती, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी २९ मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी प्रकरणात हे स्पष्टीकरण दिले. राहुल गांधी यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. वायनाड प्रकरणात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा अधिक आहे, यामुळे निवडणूक होईल, परंतु त्याला सहा महिन्यांचा कालावधी आहे, असं राजीवकुमार यांनी म्हटलं आहे. यामुळे हाच नियम पुणे येथे लागू होईल.
पुणे कसबा पेठ व चिंचवडमधील आमदारांचे निधन झाले. त्याठिकाणी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक झाली होती. त्याचप्रमाणे आता खासदार गिरीष बापट यांचे निधन झाल्यामुळे १५१A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पुण्यात पुन्हा पोटनिवडणुक होऊ शकते. कारण १९५१ सालचा १५१A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागते. लोकसभा निवडणूक २०२४ मे मध्ये पुर्ण होत आहे. आता मार्च चालू आहे. त्यामुळे एका वर्षाहून अधिक काळ आहे. त्यामुळे निवडणुक घ्यावी लागणार आहे. ही निवडणुक सहा महिन्याच्या आत घ्यावी लागणार आहे.