पुढील तीन तासात पुण्यात मुसळधार पाऊस; पिंपरी-चिंचवड मध्ये मध्यम पावसाची शक्यता
लोकवार्ता : पुढील तीन तासात पुण्यात मुसळधार पाऊस होणार आहे. तर पिंपरी-चिंचवड मध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. पुण्यात अतिवृष्टी होईल असा इशारा हवामान खात्यानं दिला होता. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या तीन तासात पुण्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, भोर, व्हेल तसेच संपूर्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड भागात माध्यम पाऊस येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस पडणार असल्यानं काही पर्यटनस्थळे बंद करण्यात आलाय आहेत. तसेच डोंगर उतारावरील आणि धरण क्षेत्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्यानं रेड अलर्ट दिल्यांनतर गेली दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली होती.