डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्लेटलेट्सच्या मागणीतही वाढ; पुण्याच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ
लोकवार्ता : पुण्यात कोरोना संपतो न संपतो तोपर्यंत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात सातत्याने पाऊस पडत असल्याने डासांची वाढ होत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची वाढ झाली आहे. काही रुग्णांना आता प्लेटलेट्सची गरज भासू लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

काही डेंग्यू रूग्णांना प्लेटलेट्सची गरज भासू शकते. कारण त्यांची प्रणाली योग्य द्रवपदार्थ आणि औषधोपचार करूनही पुरेसे प्लेटलेट्स बनवू शकत नाही. पुण्यात जुलै महिन्यात डेंग्यूचे 50 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांची संख्या 20 वर आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ससून जनरल हॉस्पिटल आणि य्ञवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटच्या मागणीत वाढ झाली. प्लेटलेट्स हे रक्तातील सेल्युलर घटकांपैकी एक आहेत. पांढऱ्या आणि लाल रक्तपेशींसह जे रक्त गोठणे आणि रक्तस्त्राव कम
करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रक्तपेढ्यांमधील अधिकाऱ्यांनी सांगितले, की दोन रुग्णालयांपैकी प्रत्येकाला आता दररोज किमान 20-25 प्लेटलेट युनिट्सची गरज आहे. डेंग्यूचे प्रमाण वाढण्यापूर्वी ससून 10 ते 15 प्लेटलेट युनिट देत होते आणि वायसीएमएचमध्ये फक्त चार ते पाच युनिटची मागणी होती. अधिकाऱ्यांनी सांगितले, की ते साठा पुन्हा पूर्ववत किंवा पुरेसा होण्यासाठी रक्तदान शिबिरांवर अवलंबून आहेत. तज्ज्ञांच्या मते, डेंग्यू तापामुळे प्लेटलेट्स नष्ट होतात आणि नवीन तयार होण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने वटी प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
आम्ही सर्वसाधारणपणे शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी बफर स्टॉक ठेवतो. परंतु प्लेटलेट्सचे शेल्फ लाइफ पाच दिवस असल्याने, आम्ही त्या जास्त साठवू शकत नाहीत. सध्या आम्ही मागणी पूर्ण करण्यास सक्षम आहोत. परंतु जर या मागणीत वाढ झाली, तर अधिक रक्तदान शिबिरे आयोजित करावी लागणार आहेत, असे ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
वायसीएमएचचे रक्त संक्रमण अधिकारी झ्ंकर मोसलगी म्हणाले, की पिंपरी चिंचवड भागात रुग्णांची संख्या कमी असू शकते. परंतु परिस्थितीनुसार काहींना उपचारादरम्यान 3-4 प्लेटलेट युनिट्सची आवइयकता असू शकते. नागरी रुग्णालयेदेखील खाजगी रुग्णालयांना पुरवठा करतात जर त्यांचा साठा कमी असेल तर. प्लेटलेट्सची सामान्य संख्या 1.5 ते 4 लाख प्रति मायक्रोलिटर असते.