महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत आळंदी शहराला शुध्द पाणीपुरवठा सुरू
-आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव साहेब व पाणीपुरवठा विभागप्रमुख अक्षयकुमार शिरगिरे साहेब यांचा पुढाकार.
आळंदी । लोकवार्ता-
वाढती जनसंख्या आणि वाढते प्रदूषण हि आळंदीकरांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. पवित्र इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्यामुळे आळंदीकर अनेक वर्षापासून विकतचे पाणी घेऊन आपली गरज भागवत होते. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत भामा आसखेड धरणातून कुरूळी टॅपिंगद्वारे(११ एम. एल. डी.) आळंदी शहराला शुध्द पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

सदर योजना पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा करून आळंदीकरांना शुध्द पाणीपुरवठा देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव साहेब व पाणीपुरवठा विभागप्रमुख अक्षयकुमार शिरगिरे साहेब यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी नगरसेवक तथा मा. उपनगराध्यक्ष सचिन रामदास गिलबिले, नगरसेवक सागर भोसले, नगरसेवक दिनेश घुले, गिरीश काटे, धर्मराज पांचाळ, ज्ञानेश्वर बनसोडे, ऋषिकेश आघाव आदी उपस्थित होते.