लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पॉलिटिक्स बाजूला ठेवत अजितदादांकडून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस

-सर्व कामे बाजूला ठेवून लक्ष्मण जगताप यांची रुग्णालय जाऊन घेतली भेट.

पिंपरी । लोकवार्ता-

भाजपचे चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांची उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बाणेर येथील खाजगी रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली.आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून केली जाणार होती. मात्र, आपले एकेकाळचे खंदे समर्थक व भाजपवासी झालेले लक्ष्मण जगताप हे दवाखान्यात उपचार घेत असल्याने याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्घाटन कार्यक्रम घेणे चुकीचे ठरते यासाठी उद्घाटन कार्यक्रम रद्द केले. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात विकास कामात लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना मोठी साथ दिली होती. ते सध्या भाजप पक्षात आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजितदादा यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. याच नात्यातून मुंबईवरून पुण्यात येताना अजितदादांनी त्यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात पोहचले. जगताप यांची प्रकृती सुधारत आहे समजते. ते शहरातील आमदार असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे शहरात विकासकामांचा काही कार्यक्रम करू नये अशी सूचना अजितदादांनी महापालिका प्रशासनाला दिली. त्यामुळेच आज पालिकाकडून होणारे सर्व कार्यक्रम काल रात्री रद्द केले होते.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani