विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड !
लोकवार्ता : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पद रिकामं होत. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यपाल विरुद्ध राज्य सरकारच्या वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद रिक्त राहिले. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. तर चेतन तुपे यांच्याकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली. तर साळवी यांना १०७ एवढ्या मतांवर समाधान मानव लागलं.