पाऊस लांबणीवर ; राज्यात १२ ते १३ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता
लोकवार्ता : यंदा मान्सून लेट असून येत्या १२ ते १३ जूनपर्यंत राज्यात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मान्सूनने कारवार, कर्नाटक-गोवा सीमेवर हजेरी लावल्याने लवकरच राज्यात पाऊस येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पाऊस लवकर येणार असल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपून घेतली आहेत. मात्र आता पुन्हा एकदा मान्सूनची तारीख पुढे गेली आहे. वेळेआधी दाखल होणार मान्सून रेंगाळला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची शक्यता होती. मात्र मान्सून पुढे गेल्याच्या बातमीने नागरिक हैराण झालेत. त्यामुळे यंदाच्या पावसासाठी आणखीन काही दिवस वाट पहावी लागणार आहे.