राजेश सावंत यांची भारतीय शरीर सौष्ठव महासंघाच्या खजिनदार पदावर निवड
पिंपरी| लोकवार्ता-
पिंपरी चिंचवडचे सांगवी येथिल रहिवासी आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनचे खजिनदार राजेश सावंत यांची भारतीय शरीर सौष्ठव महासंघाच्या राष्ट्रीय खजिनदार पदावर निवड करण्यात आली आहे.

भारतीय शरीर सौष्ठव महासंघाचे जनरल सेक्रेटरी डॉ. संजय मोरे यांनी दिल्ली येथे महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत राजेश सावंत यांना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय जोशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व गदा देऊन सन्मानित केले. आयबीबीएफएफशी देशभरातील 27 राज्यातील संघटना संलग्न आहेत. या विशेष सर्वसाधारण सभेत आयबीबीएफची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहिर करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संजय जोशी, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून डॉ. संजय मोरे आणि राष्ट्रीय खजिनदार पदावर राजेश सावंत यांची निवड करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव राजेश सावंत यांची राष्ट्रीय पदावर निवड झाली आहे. राजेश सावंत यांनी यापुर्वी पिंपरी चिचंवड बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या खजिनदार पदावर काम केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात ‘महापौर श्री’ या शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पुढील वर्षात पिंपरी चिंचवड मध्ये महिला आणि पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा त्यांचा संकल्प आहे. राजेश सावंत यांच्या निवडीचे क्रीडा क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे. दिशा सोशल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात चित्रपट निर्माता प्रविण तरडे आणि दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले यांनी सत्कार केला.
