चिखली येथील बैलगाडा शर्यतीत रामनाथ वारिंगे यांनी मारली बाजी
-हिरा आणि ओम्या यांनी ११.२२ सेकंद मध्ये शर्यत जिंकून ठरले जेसीबी चे मानकरी/
चिखली । लोकवार्ता-
भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत नुकतीच पार पडली आहे. या शर्यतीचे आयोजन भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे तसेच माजी महापौर राहुल जाधव व नितीन काळजे यांनी केले होते. या शर्यतीला बाहेर राज्यातून देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या शर्यतीचा मुख्य आकर्षण होत ते म्हणजे शर्यतीला ठेवलेले इनाम. पहिल्या नं ला चक्क जेसिबी तर दुसरा नं ला बुलेरो आणि तिसऱ्या नं ला ट्रॅक्टर ठेवण्यात आला होता. हि बक्षिसे जिंकण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून चांगलाच प्रतिसाद मिळत होता. या शर्यतीत बाजी कोण मारणार हा प्रश्न सर्वांना च पडला होता. मात्र याची उत्सुकता आता संपली आहे.
लोणीकंद येथील रामनाथ वारिंगे यांच्या हिरा आणि ओम्या यांनी ११.२२ सेकंदात घाट पार करून पहिल्या नं चा मान पटकावला आहे.

काल शर्यतीचा शेवटचा शेवटचा दिवस होता. या शर्यतीला काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे नेते नितेश राणे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महेश लांडगे यांच्यावर कौतुकाची थाप मारली. व बैलगाडा अखंड सुरु राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन देखील दिलॆ.त्याच सोबत ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील तेव्हा मी स्वतः पहिल्या बक्षिसात मर्सडीस गाडी माझ्या कडून देणार अशी घोषणा नितेश राणे यांनी यावेळी केली.