“चिखली घरकुल येथे रंगला स्वरानुभूतीचा संगीत रजनी कार्यक्रम”
-दिग्गजांच्या उपस्थितीत आमदार लांडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा
चिखली । लोकवार्ता-
पिंपरी- चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे व सरिता निलेश नेवाळे यांच्यातर्फे “संगीत रजनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. २८/११/२०२१ रोजी सा. ६ वाजता घरकुल चिखली येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .या कार्यक्रमात भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा श्री. महेश दादा लांडगे व सन्माननीय लोकप्रतिनिधी, भाजपचे सर्व पदाधिकारी आणि नागरीकांनी उपस्थिती लावुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाच्या वेळी सर्व कोरोना नियमांचे पालन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वरानुभवाच्या मैफिलीचा आनंद घेतला.
