देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत ?
१२ राज्यांमध्ये कोरोनात झपाट्याने वाढ

लोकवार्ता । प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर, नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सलग चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ हे तिसऱ्या लाटेचे लक्षण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची ३०,७७३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर ३०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३८,९४५ संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
१२ राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत. सुमारे डझन राज्यांमध्ये, कोरोनाची दैनंदिन प्रकरणे एक हजाराच्या वर येत आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनी सप्टेंबरच्या तिसच्या आठवड्यात तिसरी लाट येण्याचा अंदाजही व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत येत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मिझोरामसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा वेग वाढत आहे. केरळ अजूनही कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. राज्यात दररोज २० हजारांहून अधिक नवीन संक्रमित रुग्ण बाहेर येत आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे आली गेल्या २४ तासांमध्ये ३०,७७३ हजार बरे झाले ३८.९४५ हजार एकूण मृत्यू ३०९ झाले. गेल्या २४ तासांमध्ये ८४.४२ लाख लसी देण्यात आल्या.
आतापर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३.३२ लाख असून एकूण संक्रमित लोकांची संख्या ३.३४ कोटी आहे. एकूण ३.२६ लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. मृत्यू आतापर्यंत ४४४ लाख झाले असून एकूण कोरोना लस ८०.४३ कोटी देण्यात आल्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मते १८ सप्टेंब रपर्यंत एकूण ५५, २३,४०,१६८ नमुने चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शनिवारी १५ लाख ५९ हजारांहून अधिक लोकांचे नमुने घेण्यात आले.
देशात वाढले डेंग्यूचे संकट
नवी दिल्ली कोरोनामुळे हैराण झालेल्या भारतीयांना आता डेंग्यूचे संकट भेडसावत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून देशातील ११ राज्यांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
सेरोटाइप २ डेंग्यूची नोंद
आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये करण्यात आली आहे. या राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये सेरोटाइप २ डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाकडून ११ राज्यांमध्ये हायअलर्ट
या ११ राज्यांना केंद्राने डेंग्यूच्या प्रकरणांचा लवकर शोध घेण्यासाठी, ताप हेल्पलाईन सुरू करण्यासाठी आणि पुरेशा टेस्टिंग किट, डासांवर फवारणीच्या औषधांसह आणि उपचारासाठी औषधे साठवण्याचे आदेश दिले आहेत.