राष्ट्रपतींच्या शपत सोहळ्यात शाकाहारी भोजन ठेवा; ई-मेल द्वारे पुण्यातून आग्रह
लोकवार्ता : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी देशातील राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. आता याच शपथविधी सोहळ्यावरून पुणे पुन्हा एकदा चांगलंच चर्चेत आलं आहे. भारताच्या नव्या राष्ट्रातपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली. येत्या २५ जुलै ला शपथविधी सोहळा पार पडत आहे.

नवनियुक्त राष्ट्रपती या आध्यत्मिक असून त्या शुद्ध शाकाहारी आहे. त्यामुळे या सोहळ्यात स्नेहभोजन हे शुद्ध शाकाहारी असावे अशी मागणी शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले आहे. त्यामुळॆ या अनोख्या मागणीची आता संपूर्ण देशभर चर्चा रंगली आहे. यासंदर्भात गंगवाल यांनी संबंधित विभागाला मेल ही केला आहे.
भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून काल द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील महिलेची निवड ही सर्वोच्चपदी झाली आहे. द्रौपदी मुर्मू या अध्यात्मिक आहेत. शिवाय त्या मंसाहार करीत नसून शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांच्या शपथविधी सोहळ्यात केवळ शाकाहारी जेवण ठेवावे अशी मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी मेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्यांच्या मागणीवर काय निर्णय होणार हे आता पहावे लागणार आहे.
राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांची वर्णी लागली आहे. गुरुवारी निवडीचा निकाल लागला असून आता शपथग्रहन सोहळा होत आहे. त्याअनुशंगाने परदेशातील पाहुणे आणि देशभरातून राजकीय नेते हे उपस्थित राहणार आहेत.