लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सर्वसामान्यांसाठी समर्पित

अंमलबजावणीसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे

लोकवार्ता । प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरु झाले आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी यामधून घेतली जाणार आहे. त्यामुळे याच्या अंमलबजावणीसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे शहर ग्रामीण व पिंपरी-चिंचवड भाजप वैद्यकीय आघाडीनेच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी घरकुल लॉन्स पुणे येथे राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार पाटील बोलत होते.

या वेळी भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपले, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. तेजस्विनी अरविंद, डॉ. मनिषा जाधव, डॉ. ऐश्वर्या सुपेकर, डॉ. धनंजय जोशी, डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. प्रदीप नरवणे, डॉ. शुभदा कामत, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, डॉ. संदीप वाघ, धर्मेंद्र खंदारे, डॉ. सुनिल चौहान, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आयुष्यमान भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ हे अभियान संपूर्ण देशभरात राबिण्यात येत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य व्यवस्था मिळावे, हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी मिशन म्हणून काम केले पाहिजे. जेणेकरुन देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम स्वास्थ्य लाभेल.” तसेच हे अभियान गावोगावी, वाड्या-वस्त्यांमध्ये पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यशाळेत डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. सागर पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि संघटनात्मक बांधणीवर भाजप पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचे सत्र झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खंडारे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यशाळेत ८५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani