रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली, आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित
शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणारे ‘स्वाभिमान’चे नेते रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली.
बुलढाणा। लोकवार्ता-
शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणारे ‘स्वाभिमान’चे नेते रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली. त्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर दुसरीकडे आंदोनल ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा वाढविण्यात आला.

तुपकरांच्या आंदोलनामुळे पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसून आलेत. राज्य राखीव दलासह दंगा काबूचे पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. पोलीस तुपकरांना उचलण्याच्या तयारीत होते. तर कॅबिनेट मंत्री डॉ. शिंगणेंच्या मध्यस्थीनंतर तुपकर यांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मागण्यांवर चर्चा होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांना आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विनंतीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. बुधवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ज्या काही मागण्या आहेत, त्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार, असा इशारा यावेळी तुपकर यांनी दिला आहे.