“पुणे महानगर पालिकेचे विक्रमी बजेट सादर”
-महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले अंदाजपत्रक सादर.
पुणे | लोकवार्ता-
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले. त्यांनी 8 हजार 592 कोटींचे विक्रमी अंदाज पत्रक सादर केले. , त्यामध्ये 4 हजार 881 कोटींची महसुली कामे तर 3 हजार 710 कोटींची भांडवली प्रस्तावित केली आहेत.

अंदाजपत्रकातील कामे
विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय मार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव
सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर मधील पूल बांधणे, पाषण पंचवटी येथून कोथरुडपर्यंत बोगदा तयार करणे
खराडी बायपास येथे उड्डाण पूल
कल्याणीनगर ते कोरेगावपर्यंत होणाऱ्या पुलाचे काम
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणे यासाठी 669 कोटी रुपयांची तरतूद
पथ विभागासाठी 514 कोटींची भांडवली तरतूद
शहरांमध्ये दहा किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक
मध्यवर्ती पेठांमधील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता डांबरीकरण
अर्बन स्ट्रिट प्रोग्राम अंतर्गत पाच रस्त्यांचे नव्याने डिझाईन करण्यात येणार आहे
लॉ कॉलेज रस्त्याला समांतर असा बालभारती ते पौड रस्ता या दोन किलोमीटर रस्त्याला नियोजन
कात्रज कोंढवा रोड चे उर्वरित काम
घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरात चार नव्याने प्रकल्प अंदाजपत्रकात 128 कोटी रुपयांची तरतूद
त्यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील कचरा व्यवस्थापन
दरम्यान, महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकात प्रकल्पांची संख्या मर्यादित असली तरी उत्पन्न वाढीमध्ये स्थानिक संस्था करातून 330 कोटी, वस्तू व सेवा करातून 2 हजार 144 कोटी, मिळकतकरातून 2 हजार 160 कोटी, पाणी पट्टीतून 294 कोटी शासकीय अनुदानातून 512 कोटी, कर्जरोख्यांच्या माध्यमातून 500 कोटी, बांधकाम परवानगी शुल्कातून 1 हजार 157 कोटी, पंतप्रधान आवास योजनेतून 200 कोटी असे उत्पन्न अपेक्षीत आहे.