लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

लवकरच होणार पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात २१६ पोलीस शिपाई पदांची भरती 

लोकवार्ता : राज्यात पोलीस शिपाई भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. १४ हजार ९५६ पदांची भरती केली जाणार असून पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात २१६ पोलीस शिपाई पदांची भरती होणार आहे.

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करताना शहर पोलीस दलात पुणे शहर आणि पुणे ग्रामीण मधून मनुष्यबळ देण्यात आले. त्यामध्ये १२५५ पोलीस शिपाई पदांची पोलीस भरती तीन टप्प्यात करण्यात येणार होती. पहिल्या टप्प्यात ७४४. दुसऱ्या टप्प्यात २५९ आणि तिसऱ्या टप्यात २५२ पदे भरली जाणार होती. मात्र आयुक्तालय सुरु झाल्यापासून सन २०१९ साली जाहीर झालेल्या भरतीत ७२० पदे भरण्यात आली. या भरतीमधील उमेदवार आता राज्यातील वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान या भरती प्रक्रियेत झालेल्या कॉपी प्रकरणात ५० उमेदवारांची भरती स्थगित करण्यात आली. ते ५० उमेदवार आणि १६६ नवीन अशी एकूण २१६ पदांची भरती होणार आहे.

आयुक्तालय स्थापनेच्या चार वर्षांनंतर पहिल्या टप्प्यातील भरती झालेले मनुष्यबळ प्रत्यक्ष आयुक्तालयाला मिळणार आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील भरती जाहीर झाली आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेवेळी ठरल्यानुसार पदे न भरता पहिल्या टप्प्यात २४ तर दुसऱ्या टप्प्यात ४३ पदे कमी भरली आहेत. आयुक्तालयात १९७३ पोलीस शिपाई पदे मंजूर आहेत. त्यातील १०७३ हजर असून ९७७ पदे रिक्त आहेत.

३ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून आवेदनपत्र मागवण्यात येणार आहेत. उमेदवार एकाच घटकात एकापेक्षा जास्त अर्ज करू शकणार नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास त्याची भरती कोणत्याही टप्यावर रद्द केली जाईल. प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी होईल. त्यात ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गाच्या एकास दहा या प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेत ४० टक्यांहून कमी गुण असणारे उमेदवार अपात्र होतील. शारीरिक आणि लेखी परीक्षांमधील गुणांच्या आधारे प्रथम तात्पुरती गुणवत्ता यादी बनवून त्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी बनविण्यात येईल.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani