लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

महापालिका उपयुक्त्यांच्या कामकाजाचे पुन्हा फेरवाटप

लोकवार्ता : पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्तांसोबत सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे पुन्हा फेरवाटप करण्यात आले आहे. पालिकेच्या कामकाजाचे सातत्याने फेरवाटप केले जात आहे. कायदा विभागाचे उपयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे समाज विकास विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तर इंदरकर यांच्याकडील कामगार कल्याण विभागाचा पदभार उद्यान विभागाचे उपयुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

महापालिकेमध्ये प्रशासकीय कारणास्तव वेळोवेळी बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार आयुक्त पाटील यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात महत्वाचे फेरबदल केल. यामध्ये “ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विनोद जळक यांच्याकडे स्वच्छ सर्वेक्षण कामकाजासाठी समन्वयक पदाचा अतिरिक्त पदभार दिला.

तसेच “इ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्याकडे अतिक्रमण निर्मुलन विषयक कामकाज सोपविण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता संजय घुबे यांच्याकडील बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग काढून “क’ क्षेत्रीय (स्थापत्य) देण्यात आले. त्यांच्याकडील बांधकाम परवाना विभाग पाणी पुरवठा व जल निःसारणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्याकडे दिला आहे.

तर “क ‘ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे अनिल शिंदे यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे काम सोपविले आहे. स्थापत्य विभागाचे उपअभियंता अनिल राऊत यांच्याकडे जलनिःसारण विभागाचा तात्पुरता अतिरिक्त पदभार दिला. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी जारी केला आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani