पिंपरी चिंचवड शहरातील गुंठेवारीतील बांधकामे नियमित करावी.
पिंपरी मधील गुंठेवारीतील बांधकामांची अंमलबजावणी करून शहरवासीयांची दिवाळी गोड करण्याची मागणी नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे.
पिंपरी। लोकवार्ता-
पिंपरी मधील गुंठेवारीतील बांधकामांची अंमलबजावणी करून शहरवासीयांची दिवाळी गोड करण्याची मागणी नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे. त्यात नगरसेवक काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील गुंठेवारतील बांधकामे, घरे नियमित करण्यासाठी मागील काही दिवसापूर्वी महाविकास आघाडी सरकारतर्फे शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे त्या आदेशाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली नव्हती. परंतु आता गुंठेवारीतील घरे, बांधकामे प्रशमन शुल्क व विकास शुल्क स्विकारून नियमितीकरणाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुधारित नवीन आदेश काढण्यात आला आहे.

त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करून एक खिडकी योजनेच्या माध्यमातून नियमितीकरणाची प्रक्रिया चालू करावी. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करावी.