भोसरी-आळंदी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा;व्यापाऱ्यांची मागणी
आळंदी। लोकवार्ता-
भोसरी आळंदी रस्त्यावर दुकानांसमोर लावलेल्या हातगाडी व पथारी विक्रेत्यांमुळे दुकानदारांना व्यवसाय कारण दिवसेंदिवस अवघड होत चाललंय.महापालिका प्रशासन फक्त दिखाऊ कारवाई करत असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केल. शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी व्यापारी करत आहे.
याबाबद महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन करण्यात आले. निवेदनात व्यापाऱ्यांनी म्हणले आहे कि, भोसरी आळंदी रोड वरती हातगाडी व पथारी यांच्या व्यवसायामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे. त्यामुळे ग्राहकांना दुकांसमोर वाहने लावण्यास जागा शिल्लक राहत नाही.महापालिका प्रशासन थोड्या वेळेपुरते येऊन तात्पुरती कारवाई करतात आणि पुन्हा तेथे हातगाडी वाले रस्त्यावर येऊन विक्री करतात.

यासर्वांमधे व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जे दुकानदार आपल्या दुकाबाहेर हातगाडी लावण्यास परवानगी देतात त्यांच्यावर देखील शासनाने दंडात्मक कारवाई करावी असे व्यापारी संघाने म्हंटले आहे. या सर्वावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.