मावळ तालुक्यातील सहा गटांचे आरक्षण जाहीर
लोकवार्ता : पुणे जिल्हा परिषदेसाठी मावळ तालुक्यातील सहा गटांचे आरक्षण जाहीर झाले. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी कंबर कसली होती. मागील काही महिन्यांपासून विविध कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांशी संवाद वाढवत होते. मात्र तालुक्यातील सहा गटांपैकी केवळ एक जागा सर्वसाधारण राहिल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मावळ पंचायत समितीची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 28) वडगाव मावळ येथे पार पडला. सलग चार वर्षे गणात राखीव असलेल्या आरक्षण विचारात घेत ही सोडत जाहीर करण्यात आली.

भेगडे लॉन्स येथे मावळ पंचायत समिती आरक्षण सोडत असल्याने राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. आरक्षण सोडतची आतुरतेने वाट पाहत असताना, प्रथम अनुसूचित जाती वराळे हे लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर केले. अनुसूचित जमाती स्त्री चांदखेड जाहीर करण्यात आले.
इंदोरी व सोमाटणे यांच्यात चिठ्ठी काढल्याने सोमाटणे गणाला नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षण जाहीर झाले. सर्वसाधारण स्त्री आरक्षण टाकवे बुद्रुक, नाणे, इंदोरी, तळेगाव दाभाडे. त्यानंतर सर्वसाधारण खडकाळा, कुरवंडे, कार्ला, कुसगाव बुद्रुक, काले असे आरक्षण जाहीर झाले. काहींनी अगोदरच निवडणूकीची तयारी सुरू केली होती.
इच्छुक उमेदवारांच्या विरुद्ध आरक्षण आल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. ज्यांना सुदैवाने मनासारखे आरक्षण मिळाले त्यांच्यात आनंद निर्माण झाला. आरक्षण जाहीर झाल्याने निवडणूकीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. पक्षश्रेष्ठी उमेदवार शोध मोहीम सुरू झाली आहे. मावळ पंचायत समितीवर आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा करत पदाधिकारी व इच्छुक निघून गेले.
आरक्षण व गण पुढीलप्रमाणे :
सर्वसाधारण – खडकाळा, कुरवंडे, कार्ला, कुसगाव बुद्रुक, काले.
सर्वसाधारण स्त्री – टाकवे बुद्रुक, नाणे, इंदोरी, तळेगाव दाभाडे ग्रामीण.
नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री – सोमाटणे
अनुसूचित जमाती स्त्री – चांदखेड
अनुसूचित जाती -वराळे
जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर
मावळ तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद गट व आरक्षण पुढीलप्रमाणे – टाकवे बुद्रुक-नाणे सर्वसाधारण, खडकाळा-वराळे अनुसूचित जाती, कुरवंडे – कार्ला सर्वसाधारण स्त्री, कुसगाव बुद्रुक-सोमाटणे सर्वसाधारण स्त्री, चांदखेड-काले सर्वसाधारण स्त्री, इंदोरी-तळेगाव दाभाडे ग्रामीण नागरिकांचा मागास प्रवर्ग
यावेळी मावळ मुळशी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला.