‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’; पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे भडकल्या
पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची

लोकवार्ता । प्रतिनिधी
काल पुण्यातील आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेने कारवाई केली. दरम्यान प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पुणे महापालिकेने केलेल्या कारवाईवरुन, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर ताशेरे ओढलेत. ‘झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा’, असं म्हणत पुण्याच्या महापौरांना सुप्रिया सुळे यांनी चांगलंच सुनावलं आहे.

“पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.