आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी गणरायाकडे साकडे
मोरया गोसावी मंदिरात सामूहिक महाभिषेक करण्यात आला.
पिंपरी । लोकवार्ता-
गेल्या काही दिवसापासून चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप याची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने अंगारकी चतुर्थी निमित्त पिंपरी चिंचवड शहराचे आराध्य दैवत श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात चिंचवडचे ग्रामजोशी श्री कौस्तुभ रवडे गुरुजी यांच्या शुभहस्ते सामुदायिक महाअभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे, सुरेशजी भोईर, माजी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, भाजपा महिला शहराध्यक्षा उज्वलाताई गावडे, भाजपा चिंचवड-किवळे मंडलाचे अध्यक्ष योगेश चिंचवडे, व प्रभागचे माजी स्वीकृत नगरसदस्य विठ्ठलजी भोईर, भाजपा शहर उपाध्यक्ष शेखर आण्णा चिंचवडे, कामगार नेते हरिभाऊ चिंचवडे, दिपक गावडे, प्रशांत आगज्ञान, निलेश नेवाळे आदि सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्ष्मणभाऊंसाठी प्रार्थना केली व सामुदायिक महाभिषेक कार्यक्रमात सहभाग घेतला.