लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

खंडेवस्तीतील नागरिकांसाठी आता ‘हक्काचं घर’

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातून ९२४ सदनिकांची होणार निर्मिती
स्थानिक लाभार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रकल्पाचे स्वागत

पिंपरी । प्रतिनिधी
औद्योगिक नगरी… कामगार नगरी… बेस्ट सिटी… आणि आता स्मार्ट सिटी… अशी यशस्वी वाटचाल करणारे पिंपरी-चिंचवड शहर आता ‘झोपडपट्टीमुक्त’ होणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून यासाठी पुढाकार घेतला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट सिटी’ घडत असतानाच शहरात सुरू असलेल्या ‘एसआरए’प्रकल्प सामान्य नागरिकांची जीवनशैली सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात डिसेंबर १९९५ च्या विधानसभा अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने अफझूलपूरकर समितीच्या शिफारशी मान्य करुन महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मध्ये दुरूस्ती केली. त्याआधारे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सदस्यांचा समावेश असलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यात आले.
वास्तविक, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. यापैकी १४.७८ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत वास्तव्य करते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार झोपडपट्टी वासियांना आवश्यक त्या सोयी सुविधा युक्त मोफत घर /सदनिका उपलब्ध करून देऊन त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे व शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी एक प्रभावी अभियान ही काळाची गरजआहे.


झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत खंडेवस्ती, भोसरी येथील सुमारे ३ हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत ९२४ सदनिकांची निर्मिती होणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे सव्हेक्षणही अंतिम टप्प्यात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरएच्या नियमावलीनुसार, लाभार्थी नागरिकांना ४२० चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी परिसरातील खंडेवस्ती पुनर्वसन विकास समिती, ओमशक्ती प्रतिष्ठान, मस्जीद सिद्धीकी अकबर ट्रस्ट, धम्मचक्र मित्र मंडळ, खंडेवस्ती गणेश मंडळ, धम्मचक्र महिला मंडळ, बी. बी. फातिमा महिला बचत गट अशा संस्था, संघटनांनी एकोप्याने पुढाकार घेतला आहे.
**
झोपडीधारकांचा फायदा काय?
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून खंडेवस्ती येथील झोपडीधारकांना काय फायदा होणार? हे पाहणे तितकेच महत्त्वपूर्ण आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींच्या जागेवर घर आहे. त्या व्यक्तीला घर मिळणार आहे. तसेच, ज्या व्यक्तीचे दुकान आहे, अशा लाभार्थींना दुकान मिळणार आहे. राज्य शासनाच्या जीआरप्रमाणे लाभार्थींना ४२० चौरस फूट म्हणजेच कार्पेट एरिया ३०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे. हा प्रकल्प खंडेवस्ती म्हणजे ज्या ठिकाणी झोपडपट्टीतील नागरिक राहतात त्याच ठिकाणी होणार आहे.
नागरिकांना सतर्कतचे आवाहन…
खंडेवस्ती येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला व्यक्तीगत फायद्यासाठी विरोध किंवा चुकीची माहिती देवून नागरिकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘एसआरए’मध्ये ज्या झोपडपट्टीवासीयांची नोंद झालेली आहे. त्यांची यादी खंडेवस्ती मुख्य चौकात दर्शनी भागात लावली आहे. या प्रकल्पाबाबत चुकीची माहिती देवून पैशाची मागणी करण्याचा प्रयत्न होतो. त्याला बळी पडू नये, असे आवाहन काही सूज्ञ नागरिक करीत आहेत.
प्रतिक्रीया :
संपूर्ण आयुष्य झोपडीत राहून जगलो. आता आमच्या मुलाबाळांना हक्काचे घर मिळणार आहे. आमच्या लोकांचे जीवनमान उंचवण्यासंदर्भात प्रशासनाने चांगला निर्णय घेतला आहे. मुलांसाठी खेळाचे मैदान, धार्मिक प्रार्थना स्थळही या ठिकाणी होणार आहे. घाणीचे सम्राज्य संपणार असून, आम्हाला चांगली जीवनशैली अनुभवयाला मिळेल. याचे समाधान वाटते.

https://lokvarta.in/

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani