येत्या रविवारी होणार रिव्हर सायक्लोथॉन भव्य रॅली
लोकवार्ता : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इंद्रायणी स्वच्छता जनजागृती मोहीम अभियानांर्गत रिव्हर सायक्लोथॉन भव्य रॅली येत्या रविवारी भोसरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

या रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिने अभिनेते प्रवीण तरडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, PMRDA आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते होणार आहे.
वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे नदी प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नदीची स्वच्छता ही आजच्या काळाची प्रमुख गरज झाली आहे. औद्योगिकीकरणामुळे शहरभर कचरा आणि घाणीचे साम्राज्य वाढत आहे आणि याचा आघात नदीवर होताना दिसतो. त्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी महापालिकेला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. निर्माण होणाऱ्या कचऱ्यात बऱ्याच गोष्टी रिसायकल करण्यासारख्या असतात. त्या रिसायकल झाल्या तर नदी अथवा अन्य ठिकाणी वाढणारा कचरा आपोआप कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. या सर्व प्रश्नांवर मात व्हावी यासाठी या रिव्हर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी या सायकलथॉनमार्फत Recycle, Reduce, Reuse to Save Enviorment ही संकल्पना मांडण्यात येत आहे. या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी एक विशेष मोहीम राबवून पिंपरी चिंचवड शहरांमधील सर्व शाळांमध्ये, सोसायट्यांमध्ये, कंपन्यांमध्ये जाऊन पर्यावरण संवर्धनांतर्गत ”सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, नदी स्वच्छता” या विषयांतर्गत 27 नोव्हेंबर पर्यंत सर्व पर्यावरण प्रेमींनी जनजागृती करत या रिव्हर सायक्लोन रॅलीमध्ये सहभागी व्हावे, यासाठी आवाहन करण्यात आले आहे
या अभिनव उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पर्यावरण गतविधी, होम मानसिक पुनर्वसन आणि व्यसनमुक्ती केंद्र, डॉक्टर असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन, वकील संघटना, रोडरी क्लब, लायसन्स क्लब, माजी सैनिक संघटना, पतंजली योग, महाराष्ट्रातील सर्व सायकल प्रेमी संस्था, सर्व पर्यावरण प्रेमी संस्था यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच तृतीयपंथींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यातील एक रॅली तृतीयपंथींमार्फत लीड करण्यात येणार आहे.
इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती करण्यासाठी येत्या रविवारी २७ नोव्हेंबर रोजी भोसरी गाव जत्रा मैदान येथे भव्य रिव्हर सायक्लोथन रॅली आयोजित करण्यात येत आहे. अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरी येथील गाव जत्रा मैदानावरून सकाळी ठीक ६ वाजता या भव्य रॅलीची सुरुवात होणार आहे.
या सायकल मोहिमेत लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच किलोमीटरचा पल्ला गाव जत्रा मैदान ते लांडगे पेट्रोल पंप – इंद्रायणी नगर – शांतीनगर – गाव जत्रा मैदान असा असेल तर 15 किलोमीटरचा पल्ला गाव जत्रा मैदान ते जय गणेश साम्राज्य – क्रांती चौक – स्पाईन सिटी मॉल चौक – गवळी माथा – गाव जत्रा मैदान असा असेल तसेच 25 किलोमीटरचा पल्ला हा गाव जत्रा मैदान ते जय गणेश साम्राज्य – क्रांती चौक – कृष्णा नगर – स्पाईन सिटी मॉल – गौरी माथा – गाव जत्रा मैदान असा असे, अशी माहिती डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.
इंद्रायणी स्वच्छता जनजागृती मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व शाळा आणि विद्यार्थी तसेच खाजगी 60 पेक्षा अधिक शाळांमध्ये शालेय स्तरावर चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली आहे. यामध्ये १५००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये मनपा स्तरावर शालेयंतर्गत चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामधील विजेतांना रिव्हर सायक्लोथॉन मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी मकरंद निकम शहर अभियंता, अजय सारठाणकर उपायुक्त आरोग्य विभाग, रविकिरण घोडके उपायुक्त माहिती व जनसंपर्क विभाग, डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, शिवराज लांडगे, आनंद पिसे, बापू शिंदे, सुनील बेळगावकर, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे, डॉ.अश्विनी वानखेडे, रविकिरण केसरकर, तृतीयपंथी सोनाली दळवी, मोतीलाल तालेरा स्कुल (इंग्रजी माध्यम ) च्या मुख्याध्यापिका सीमा शादबार हे उपस्थित होते.