उद्या देहूगावातील मार्ग खासगी वाहनांसाठी बंद ! जाणून घ्या काय आहेत नियम व अटी..?
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तब्बल २००० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
देहू । लोकवार्ता
पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्या साठी येणार आहे.त्याच सोबत देहू नगरीमध्ये शिळा मंदिराच्या उदघाटनासाठी ते देहू मध्ये येणार आहेत. शिळा मंदिराचे उदघाटन झाल्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पिंपरी चिंचवड मध्ये येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची खास व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 10 पोलीस उपायुक्त, 10 सहायक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 300 पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, 2000 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूत काही तासांमध्ये दाखल होतायेत, त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार पडल्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. तेथील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

पार्किंग आणि येण्या-जाण्याचा मार्ग हा महत्त्वाचा आहे. जुन्या हायवेवरून पूर्णपणे नो एन्ट्री करण्यात आली आहे. तो मार्ग केवळ व्हीआयपी वाहनांसाठीच राहील. ज्यांना कार्यक्रमासाठी यायचे आहे, त्यांनी तळवडे या मार्गे यावे. देहूगावामधील मार्ग हे खासगी वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. तळवडेवरून आल्यानंतर याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग केल्यानंतर बसने सभाठिकाणचा जो पॉइंट आहे, त्याठिकाणी सोडले जाईल.
पाण्याच्या बाटल्या, बॅगा या सभाठिकाणी आणण्यास प्रतिबंध आहे. दीड तासाचा साधारणपणे कार्यक्रम असणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची खबरदारी पोलिसांतर्फे घेण्यात येत आहे. एकूणच देहूनगरीला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.