लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पुण्यात तब्बल 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा

-सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी सदनिका दुसऱ्याच लोकांना विकून केली ही फसवणूक

पुणे | लोकवार्ता-

पुण्यातील वारजे माळवाडी भागात रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मूळ सभासद असलेल्या हक्काच्या सदनिका दुसऱ्याच लोकांना विकून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात या सोसायटीचे चेअरमन अंबादास गोटे आणि सेक्रेटरी गणेश माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पाच एकर जागेवर भटक्या विमुक्त समाजातील लोक राहत होते. मात्र त्यावेळेस या लोकांची फसवणूक करत हे फ्लॅट परस्पर विक्री करण्यात आले. यामुळे याविरोधात लढा देणाऱ्या नागरिकांनी आम्हाला आमची घरे परत मिळावीत, अशी मागणी केली आहे.

चेअरमन अंबादास गाटे आणि सेक्रेटरी गणेश बजरंग माने (वय 42, रा. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तर कामगार कंत्राटदार दीपक अशोक वेताळ (वय 40, रा. मोशी) यांनी याविषयी तक्रार दाखल केली. वारजे माळवाडी येथे गृहप्रकल्प उभारला जाणार होता. यासाठी 218 सभासदांनी नावे नोंदविली होती. या सभासदांना सरकारकडून मिळणाऱ्या जागेवर घरे बांधून देण्याचे आमिष या आरोपींनी दिले होते. याविरोधात अशोक वेताळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani