पुण्यात किडनी रॅकेटप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकमधील १५ डॉक्टरांवर गुन्हा दाखल
लोकवार्ता: पुण्यात किडनी रॅकेटप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकमधील १५ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किडनी रॅकेटप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची बदली करून फसवणूक केली असा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यात किडनी रॅकेटप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकमधील १५ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किडनी रॅकेटप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची बदली करून फसवणूक केली असा आरोप करण्यात आला आहे.
१५ लाख रुपयांचे अमिश दाखवून कोल्हापुरातील महिलेची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केली होती. त्यांनतर आरोग्य विभाग कामाला लागले. संबंधित महिलेने आणि एजंटनी बनवलेल्या खोट्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी डॉ. तावरे अध्यक्ष असलेल्या विभागीय प्रत्यारोपण समितीने केली नसल्याचा ठपका समितीवर ठेवण्यात आला आहे. किडनी प्रकरणी झालेल्या प्रत्यारोपण प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या आधिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच अधीक्षक डॉ. आज तावरे यांना निलंबित करण्यात आले होते. आता याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.