पिंपरी विधानसभा भाजप प्रभारीपदी सदाशिव खाडे यांची निवड
पिंपरी।लोकवार्ता-
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे यांची पिंपरी विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाशिव खाडे यांच्या कडे नियुक्तीचे पात्र सुपूर्द केले आहे . हे पत्र भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, सरचिटणीस राजू दुर्गे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांनी काम केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य आणि प्रदीर्घ अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खाडे यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.