लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी प्रकरणातील गोलमाल येणार उघडकीस ?”

पिंपरी| लोकवार्ता-

पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने नगरविकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीच्या कामांबाबत महापालिकेला विचारणा केली. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे की नाही, कामात अनियमितता झाली की नाही, या बाबतचा अहवाल राज्याच्या नगरविकास मंत्रालयाला पाठवण्यात आलेला आहे.

गेल्या काही काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या कामांबाबत बहुतांश तक्रारी प्राप्त होत असताना ,स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली रस्ते खोदाई, सुशोभीकरण कार्यक्रम, गार्डन, सीसीटीव्ही बसविणे या सर्व कामांत भ्रष्टाचार झाले असल्याचे आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांसह सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही देखील करत आहेत.

स्मार्ट सिटीच्या 250 कोटींच्या कामाला तांत्रिक मान्यता घेतली नसल्याचे उघड झाले. तसेच स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवत उपठेकेदार नेमले आहेत, असा आरोप सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. स्मार्ट सिटीबाबत शहरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी जात असल्याने नगरविकास मंत्रालयाने याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र पाठवत विचारणा केली. त्यानुसार पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अहवाल नगरविकास खात्याला पाठविला आहे.

स्मार्ट सिटीबाबत नगरविकास मंत्रालयाला तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी महापालिकेकडे स्मार्ट सिटीच्या कामांचा अहवाल मागविला. त्यानुसार नुकताच नगरविकास मंत्रालयाला स्मार्ट सिटीच्या कामाबाबत अहवाल पाठविल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani