मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
लोकवार्ता : संदीप वाघेरे व जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हेल्थ व्हॅल्यू संस्थेच्या सहकार्यातून पिंपरीगावातील ज्येष्ठ नागरिक संस्था सभागृहांमध्ये दिनांक 8 ते 14 जून पर्यंत मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
संदीप वाघेरे व जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हेल्थ व्हॅल्यू संस्थेच्या सहकार्यातून पिंपरीगावातील ज्येष्ठ नागरिक संस्था सभागृहांमध्ये दिनांक 8 ते 14 जून पर्यंत मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ज्येष्ठ नागरिक व महिलांचा प्रतिसाद लाभला. जवळपास 600 हून अधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे.

याप्रसंगी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरी येथील ज्येष्ठ नागरिक संस्था व जेष्ठ नागरिक संघ यांना ॲक्युप्रेशर थेरपी मशीन भेट स्वरूपात देण्यात आली. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष धुंड्या स्वामी, कार्याध्यक्ष सुधाकर यादव, सचिव अशोक कुदळे, गुलाबराव सोनवणे, वसंत तावरे, सामाजिक कार्यकर्त्या रंजना जाधव आदी उपस्थित होते.