उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करायची होती…. पण… रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट
लोकवार्ता : संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषेदेतून त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

त्यानंतर लगेचच रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते, मात्र तिथे संजय राऊत आले आणि सर्व फिस्कटलं असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना देखील अटक झाली होती, मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत. ते लढाई जिंकून येतील, असा विश्वास त्यांना वाटत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेतून जे फुटले ते भाजपाचे गुलाम झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. गुलाम कोण कोणाचं होतं हे बघा. तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम आहात का याचा विचार केला पाहिजे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना देखीलअटक झाली होती, मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत. असं कदम यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार होते मात्र संजय राऊत तिथे आले आणि सर्व फिस्कटले असा गौप्यस्फोटही कदम यांनी केला आहे.