विठूनामाच्या गजरात पाऊले चालले पंढरपूरा..
संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना.
आळंदी । लोकवार्ता
तब्बल दोन वर्षानंतर कोरोना च विघ्न संपलेलं असताना पायी वारीसाठी परवानगी मिळेळलेली आहे.काल संत तुकोबांची पालखी प्रस्थान सोहळा आनंदात पार पडला असताना आता माउलींच्या पालखी प्रस्थाला सुरुवात झाली आहे. दोन वर्षानंतर वारकऱ्यांना पंढरपूर कडे पायी वारीने जात येणार असून सर्व सोयीची व्यवस्था करण्यात आली आहे.संत ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थानाला जवळपास लाखो संख्येने भाविकांनी सहभाग घेतलेला आहे.

ज्ञानोबांची पालखी सकाळी ७ वाजताच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे.सकाळी पहाटेच्या वेळी ज्ञानोबांची पूजा अर्चा करून पालखी सोहाळा सुरु झाला.कित्तेक दिवसांपूर्वीच सर्व भाविक आळंदी मध्ये दर्शनासाठी पोहचले होते. या सर्वांची राहण्यापासून खाण्याची व्यवस्था आळंदी संस्थानाकडून घेण्यात आली होती. यावेळी पालखी मार्गावर वाहनांस बंदी घालण्यात आलेली आहे.ठिकठिकाणी पाण्याची व खाऊ वाटण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.विठूनामाच्या गजरात वारकरी तल्लीन होऊन हा सोहळा अनुभवत आहे.