जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाचे वेळापत्रक जाहीर
-तारीख जाहीर झाल्यामुळे वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देहू । लोकवार्ता
वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान तारिक जाहीर करण्यात आली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थांनने या सोहळ्याची आज घोषणा केली आहे. त्यामुळे वारकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूर मध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे.

गेल्या दोन वर्षे कोरोनामुळं पायी वारीत खंड पडला होता. आता आषाढी वारीची घोषणा झाल्यामुळं वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा हा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. कोरोना ओसरल्यामुळं सध्या सर्व निर्बंध शिथिल करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याने वारकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.