पिंपरी चिंचवड अधिवेशनात गाजली सातारच्या वाघाची एन्ट्री
लोकवार्ता : गेल्या दोन दिवसात झालेल्या द्विवार्षिक अधिवेशनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अधिवेशनाला चार चांद लावले ते सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटने यांच्या एन्ट्रीने. ‘कोण आला रे कोण आला, सातारचा वाघ आला’ अशा घोषणा देत त्यांची दमदार एन्ट्री करण्यात आली.

मराठी पत्रकार परिषदेचे यावर्षी ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन थेरगाव पिंपरी चिंचवड येथे पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनासह अनेक दिग्गज लोकांचा समावेश होता. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात आली. यावेळी सातारच्या हरीश पाटणेंनी घेतलेली दमदार एन्ट्री चांगलीच गाजली.