लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत भंडाऱ्याची उधळण

अवघी जेजुरी भंडाऱ्यात न्हाऊन निघाली.

जेजुरी । लोकवार्ता-
आज सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांनी जेजुरी मध्ये दर्शनासाठी चांगलीच गर्दी केली आहे.यावेळी भाविकांनी केलेल्या भंडार्याच्या उधळणीमुळे सर्व जेजुरी पिवळी धमक झाली आहे.सोमवती अमावास्येला भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी येत असतात.महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्तानं यात्रा सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे. सोमवारी अमावस्या येतं असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते. खंडेरायाची जेजुरी आज अशी पिवळीधमक झाली आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली. पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यायाची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलंय. खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या. या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत गर्दी केली आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani