राज्यातील सर्व शाळा गजबजला ; विध्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजल्या
लोकवार्ता : राज्यातील शाळा पुन्हा एकदा जोमाने सुरु झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी चॉकलेट आणि फुलं देऊन विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
राज्यातील शाळा पुन्हा एकदा जोमाने सुरु झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी चॉकलेट आणि फुलं देऊन विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच वर्ग भरल्याने शिक्षकांच्या उत्साहात वाढ झाली आहे. दरवर्षी जून महिन्यात शाळा चालू होतात. यावर्षी ही नव्या जोमाने वर्ग भरले असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजवण्यात आल्या आहेत.

राज्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातही शाळा आजपासून सुरु झाल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच पहिली ते आठवीच्या विध्यार्थ्यांना अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर ८२ हजारापेक्षा जास्त शाळांमधून पाच कोटी ३८ लाखांपेक्षा जास्त पुस्तकांचं वितरण करण्यात आलं आहे.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार