लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

मूर्ती दानाच्या महापालिकेच्या उपक्रमाला गालबोट; मोशीतील कचरा डेपोजवळील खाणीत टाकल्या गणेश मुर्त्या

लोकवार्ता : यंदाच्या गणेश विसर्जनात महापालिकेने केलेल्या मूर्ती दान उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. परंतु यावर्षी मोशी भागात घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मूर्ती

यंदाच्या गणेश विसर्जनात महापालिकेने केलेल्या मूर्ती दान उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. परंतु यावर्षी मोशी भागात घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांनी मनोभावे दान केलेल्या मुर्त्या मोशीतील कचरा डेपोजवळील खाणीत टाकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे हा नेमका पर्यावरण पूरक उपक्रम आहे की लोकांच्या भावनांना खेळ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

म्हणून गणपती बाप्प्पा मोरया असं म्हणतात?

काल गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मोशीतील अनेक ठिकाणी मूर्ती दान करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या या आव्हानाला लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र महापालिकेमार्फत या मुर्त्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे ”मूर्ती दान, की देवतांचा अपमान?” असा सवाल काही स्थानिकांनी व्यक्त केला आहे. जर आमच्या देवतांचा असाच अपमान होणार असेल तर असे उपक्रम राबवू नका, असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
10 फेमस ट्रेकिंग प्लेस | Best Trekking Place Near Pune महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काही खास फोटो गुलाबी वेशात सोनालीची अदाकारी | Sonalee Kulkarni प्राजक्ता माळीचा मराठमोळा लुक | Prajakta Mali Marathi Actor या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला द्या ‘हे’ गिफ्ट्स