टीम इंडियामध्ये पुण्याच्या पठ्ठ्याची निवड
ऋतुराज गायकवाडसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले

लोकवार्ता।प्रतिनिधी
पुणे : टीम इंडियाची पहिली सीनियर टीम A ही इंग्लंड दौऱ्यावर आहे. १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची सीरिज खेळवली जाणार आहे. तर टीम इंडियाची दुसरी टीम B ही जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंके विरुद्ध ३ वन डे आणि ३ टी २० सीरिज खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी टीम इंडियाच्या B टीमची घोषणा करण्यात आली आहे.

टीम इंडियामध्ये महाराष्ट्रीतील पुण्याच्या पठ्ठ्याची निवड झाली आहे. ऋतुराज गायकवाडसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले असून त्याला संधी मिळाली आहे. ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये कॅप्टन कूलच्या संघाकडून खेळत आहे. त्याला टीम इंडियाकडून संधी मिळाल्यानं आता त्याचं कौतुक होत आहे.
राहुल द्रविड टीम Bचा कोच तर शिखर धवन नेतृत्व करणार आहे. भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सांभाळण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, पडिक्कल, आर गायकवाड, एस यादव, एम पांडे, हार्दिक पंड्या, नितीन राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, चहर, के गौथम, कृणाल पंड्या, के यादव, व्ही चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), डी चहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया यांची निवड करण्यात आली आहे.
काय आहे टीम इंडियाचं शेड्युल?
भारत विरुद्ध श्रीलंका १३, १६ आणि १८ जुलै दरम्यान वन डे सामने होणार आहेत. तर २१, २३ आणि २५ जुलै दरम्यान टी २० सामने खेळवले जाणार आहेत. टी २० सामने संध्याकाळी ७ वाजता तर वन डे सामने दुपारी १.३० वाजता खेळवले जाणार आहेत. हे सामने संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू लगेच परतणार आहेत.