स्व. प्रितम शरद बोऱ्हाडे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर पडले पार
लोकवार्ता : काल (दि. २९) स्व. प्रितम शरद बोऱ्हाडे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त “चाकण ब्लड बँक” यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या शिबिरात ९४ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, उपमहापौर शरद बोऱ्हाडे, नगरसेवक संजयशेठ वाबळे , नगरसेविका नम्रताताई लोंढे, वंचित बहुजन आघाडी युवा शहराध्यक्ष गुलाब पानपाटील, योगेश आप्पा लोंढे, प्रताप ममा मोहिते, निखिल बोऱ्हाडे, संपतमामा लांडगे, भगवा ग्रुप अध्यक्ष पै. योगेशभाऊ म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. हे शिबीर मोरया चौक इंद्रायणी नगर येथे आयोजित करण्यात आले होते.