आमदार महेश लांडगे यांनी शाहिद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या परिवाराला दिलेला शब्द केला पूर्ण
लोकवार्ता: वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारत मातेच्या रक्षणार्थ ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी,आजरा येथील ऋषिकेश यांना भारतीय सैन्यात भरती होऊन अवघे दोन वर्ष झाले होते.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारत मातेच्या रक्षणार्थ ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी,आजरा येथील ऋषिकेश यांना भारतीय सैन्यात भरती होऊन अवघे दोन वर्ष झाले होते.ही गोष्ट आदरणीय आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांना समजली असता आपण समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना मनात तसेच देश सेवा करणा-या सैनिकांबद्दल आणि त्यांच्या परीवारावर असणारे विशेष प्रेम ठेवून दादांनी शहीद जवान ऋषीकेश यांची बहीण कल्याणी हिला भावाची कमी जाणवू नये यासाठी कल्याणी आपली बहीण बनवून रक्षाबंधनाच्या दिवशी कोल्हापूर येथे जावून राखी बांधून घेत ऋषीकेशचे घराचे स्वप्न दादांनी पुर्ण करण्याचा शब्द दिला आणि आज तो सत्यात उतरला आहे.
घर बांधून पुर्ण झालेले असून त्याच्या वास्तूशांती साठी आदरणीय आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांनी उपस्थित राहून घरासाठी लागलेल्या खर्चाचा धनादेश शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या मातोश्री कविता रामचंद्र जोंधळे आणि कल्याणी यांच्या हातात दिला व तसेच पुढे आणखी काही मदत लागली तर नक्की सांगा असे बोलून आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक पणा दाखवून दादांनी समाजाला एक आदर्श निर्माण केला आहे.