‘शेखर सिंह, बंगला खाली करा’ : उदयनराजेंचा माजी आयुक्तांना सज्जड दम?
लोकवार्ता : साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली होऊन महिना उलटून गेला. तरीही त्यांनी त्यांचा साताऱ्यातील शासकीय बंगला रिकामा केला नाही. त्यामुळे नव नियुक्त जिल्हाधिकाऱ्यांना रेस्ट हाऊसमध्ये राहण्याची वेळ आली आहे.

यावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ”आता आपण मेहरबानी करून बंगला खाली करा.” जर तुमच्याकडे ऍडिशनल चार्ज नसेल तर तुम्ही तात्काळ बंगला सोडा असं खासदार उदयराजे भोसले यांनी शेखर सिंह यांना हात जोडून विनंती केली आहे.
म्हणून गणपतीच्या जयघोषात घेतलं जात ‘या’ भक्ताचं नावं… रंजक कथा
नवं नियुक्त जिल्हाधिकाऱ्यांची यामुळे गैरसोय होत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे दौरे लागताच पुन्हा नवं नियुक्त जिल्हाधिकाऱ्यांना रेस्ट हाऊस खाली करावे लागेल. त्यामुळे साताऱ्यातील तुमचा कार्यकाळ संपला आहे, आता तुम्ही तात्काळ बांगला खाली करावा, असं उदयनराजे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी शेखर सिंह यांनी पिंपरी पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे.