शिंदे सरकारच्या बाजून १६४ तर विरोधात ९९ मत
लोकवार्ता : राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीनंतर शिवसेनेत फुट पडल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या बरोबर एकनाथ शिंदे यांचा गट सत्तेत आला आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी विधानसभेत बहुमत सिध्द करण्यास सांगितले. सोमवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या बाजूने 164 इतकी तर विरोधात 99 इतकी मते पडली व सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

राज्यसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर राज्यात शिंदे गटाचे सरकार भाजपच्या मदतीने सत्तेत आलं.